NEWS
Search

होम मिनिस्टर कार्यक्रमात महिलांचा उत्स्फूर्त सहभाग – विविध खेळांसह रेफ्रिजरेटर, टीव्ही, गिझर व फिल्टर आकर्षक बक्षिसांचे वाटप 

133
समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (देवकीनंदन शेटे,मुख्य संपादक) – श्री गुरुदेव दत्त फ्रेंडशिप ग्रामविकास प्रतिष्ठानच्या वतीने सार्वजनिक गणेशोत्सव २०२६ निमित्त आयोजित करण्यात आलेला ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रम काल रविवारी सायंकाळी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमात सुमारे २०० महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.महिलांसाठी ‘नमस्कार राम राम’, नागिन डान्स, टिकली चिटकवणे, दोरा ओढणे, केसात स्ट्रॉ अडकवणे यांसह विविध मनोरंजक खेळ व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. महिलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत कार्यक्रमाची रंगत वाढवली.
       येथील हनुमान मंदिरानजीक असलेल्या मंडळाच्या भव्य मंडपात सायंकाळी ८ वाजता ‘होम मिनिस्टर खेळ पैठणीचा’ कार्यक्रम सुरु करण्यात आला. हा कार्यक्रम श्री.अविनाश पोकळे युवा नेते, कवठे येमाई तसेच स्व. यशवंत कारभारी पोकळे यांच्या स्मरणार्थ कु.अजित दिलीपराव पोकळे यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
महिलांसाठी विविध मनोरंजक खेळ व स्पर्धांचे आयोजन करण्यात येऊन विजेत्या महिलांना पैठणीसह आकर्षक बक्षिसे देण्यात आली.परिसरातील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. स्पर्धेतील विजेत्यांना मंडळाच्या वतीने आकर्षक बक्षिसे देण्यात आली. प्रथम क्रमांकाचे रेफ्रिजरेटरचे बक्षीस रोहिलेवाडी येथील माया पवार, द्वितीय क्रमांकाचे टीव्हीचे बक्षीस अश्विनी घुले, तृतीय क्रमांकाचे गिझरचे बक्षीस राणी सांगडे, तर चतुर्थ क्रमांकाचे फिल्टरचे बक्षीस सुजाता पोकळे यांनी पटकावले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष अक्षय भंडारी,उपाध्यक्ष सागर जाधव,नितीन मुखेकर,अथर्व काळे,संकेत चव्हाण,सचिव ओंकार बांगर,हृषीकेश बंब,कृशिकेष जाधव,शुभम कुंभार,अभि कांदळकर,विकास जाधव,चिराग रावल यांच्यासह सर्व पदाधिकारी व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रम शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली असल्याची माहिती मंडळाचे तरुण सदस्य आदित्य गावडे यांनी दिली.
– सुभाष शेटे,९९७५६७४२८६



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *