समाजशील न्यूज नेटवर्क, शिरूर,पुणे (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाबरोबरच त्यांचा शारीरिक व मानसिक विकास ही महत्त्वाचा असून, खेळामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, शिस्त, एकाग्रता, सहनशक्ती आणि स्पर्धात्मक वृत्ती निर्माण होते. याच उद्देशाने रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्था, रामलिंग व स्व. गणेश गौतम घावटे पाटील यांच्या वतीने जनसेविका सौ. राणीताई कर्डिले यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, रामलिंग येथे धावणे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. खिलाडूवृत्तीने स्पर्धेचा आनंद घेत विद्यार्थ्यांनी आपल्या धावण्याच्या कौशल्याचे दर्शन घडविले.
धावण्या सारख्या खेळांमुळे शरीराला ताकद व सहनशक्ती वाढवण्याबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आणि जिद्द निर्माण होते. त्यामुळे शिक्षणासोबत खेळालाही तितकेच महत्त्व दिले पाहिजे, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.प्रत्येक वर्गातील प्रथम क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. बक्षीस वितरणामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.सौ.राणीताई कर्डिले या आपल्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने विविध उपक्रम राबवत असल्याचे यावेळी उपस्थितांनी नमूद केले. जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकणारी मुले आर्थिकदृष्ट्या सामान्य परिस्थितीतून येत असली तरी त्यांच्यात गुणवत्ता व प्रतिभा मोठ्या प्रमाणात असते. अशा विद्यार्थ्यांना प्रोत्साहन व प्रेरणा देण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेण्याची गरज असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.यावेळी पंचायत समिती सभापती सौ. स्वातीवहिनी घावटे, ग्रामसदस्य केशवदादा शिंदे, डॉ. वैशाली साखरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश लोंढे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले तसेच सौ. राणीताई कर्डिले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमास ग्रामसदस्य लताताई इसवे, शिरूर शहर राष्ट्रवादी युवती अध्यक्ष श्रुतिका झांबरे, राष्ट्रवादी उपाध्यक्ष शीतल शर्मा, आशा वर्कर बोराडे ताई, रामदास कर्डिले, ललिता साबळे, मुख्याध्यापिका सुनीता जगताप, मांजरे मॅडम, लाळगे मॅडम, वाबळे मॅडम, जगदाळे सर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उपस्थित सर्व मान्यवर, शिक्षक व विद्यार्थ्यांचे आभार रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा सौ. राणीताई कर्डिले यांनी मानले.
Home पुणे खेळाचे शिक्षण क्षेत्रात महत्त्वाचे स्थान; जनसेविका राणीताई कर्डिले यांच्या वाढदिवसानिमित्त रामलिंग येथे विद्यार्थ्यांसाठी धावणे स्पर्धेचे आयोजन

खेळाचे शिक्षण क्षेत्रात महत्त्वाचे स्थान; जनसेविका राणीताई कर्डिले यांच्या वाढदिवसानिमित्त रामलिंग येथे विद्यार्थ्यांसाठी धावणे स्पर्धेचे आयोजन
BySamajsheel NewsSeptember 17, 20260
