समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – कवठे येमाई सहकारी सोसायटी समोरील भव्य प्रांगणात ‘नवज्योत सार्वजनिक गणेशोत्सव २०२६’ ला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली असून, मंडळाच्या वतीने दि. १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान विविध धार्मिक, सांस्कृतिक, मनोरंजनात्मक व विद्यार्थ्यांसाठीच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहेत.
उत्सवाची सुरुवात दि. १४ सप्टेंबर रोजी श्री गणेशमूर्तीची भव्य मिरवणूक व प्राणप्रतिष्ठापनेने झाली. त्यानंतर पुढील दिवसांत लहान मुलांसाठी वन मिनिट स्पर्धा व खेळ, महिलांसाठी संगीत खुर्ची, तसेच जादूगाराचा कार्यक्रम, हिप्नोटिझम, रेकॉर्ड डान्स स्पर्धा, भव्य गायनाचा कार्यक्रम आणि ‘होम मिनिस्टर’ यांसारख्या आकर्षक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी शालेय हस्ताक्षर स्पर्धा व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २४ सप्टेंबर रोजी सत्यनारायण महापूजा व महाप्रसाद, तर दि. २५ सप्टेंबर रोजी श्री गणेशाची भव्य दिव्य विसर्जन मिरवणूक व प्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.तसेच उत्सवादरम्यान दररोज रात्री १० ते ११ या वेळेत नवज्योत रास दांडिया होणार असून, विविध कार्यक्रमांमुळे गणेशपेठ परिसरात भक्ती, कला आणि मनोरंजनाचा रंग चढणार आहे.“आपला मोलाचा सहभाग या उत्सवात घ्यावा,” असे आवाहन नवज्योत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

