समाजशील न्यूज नेटवर्क, शिरूर,पुणे : (देवकीनंदन शेटे,संपादक) – शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील ग्रामपंचायतीच्या श्री येमाई माता सभागृहात आज शनिवार दि. १४ रोजी स्पार्क मिंडा फाउंडेशन,कवठे येमाई ग्रामपंचायत व येथील प्रहार दिव्यांग संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत दिव्यांग सशक्तीकरण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबीरात परिसरातील ५० दिव्यांगांनी सहभाग सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत पोलीस मित्र,ग्राहक,पत्रकार संरक्षण व माहिती अधिकार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश प्रसिद्धी प्रमुख,मार्गदर्शक तथा राष्ट्रीय किसान मंच चे महाराष्ट्र प्रदेश प्रमुख जेष्ठ पत्रकार प्रा.सुभाष शेटे हे होते.स्पार्क मिंडा फाउंडेशनचे दिनेश पाटील,डॉ. हर्षिता शोभानी,सतीश मुळे या शिबीराश उपस्थित होते.प्रहार ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन वैभव झांजे,स्थानिक प्रहार दिव्यांग संस्थेचे किशोर गोसावी,प्रवीण घोडे, राहुल मुंजाळ यांच्या विशेष प्रयत्नातून दिव्यांगांसाठी पहिलेच शिबीर आयोजित करण्यात आले होते.
यावेळी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मिठूलाल बाफना,माजी उपसरपंच विठ्ठल मुंजाळ,पांडुरंग भोर,अभिनव पोकळे,सामाजिक कार्यकर्ते अविनाश पोकळे हे उपस्थित होते. फाउंडेशनच्या वतीने उपस्थित दिव्यांगांची माहिती संकलित करण्यात आली. त्यात त्या त्या दिव्यांगांना कृत्रिम पाय,कृत्रिम हात, व्हील चेअर,कॅलिपर,कुबड्या,काठी,वाकर मोफत देण्यात येणार असून फाउंडेशनच्या वतीने नाव नोंदणी केलेल्या दिव्यांगांचे यु आय डी कार्ड रजिस्ट्रेशन करण्यात येणार आहे. तर येत्या २३ डिसेंबरला राजगुरुनगर चांदोली फाटा येथील फाउंडेशनच्या कार्यालयात दिव्यांगांना त्यांना आवश्यक असणारे साहित्य मोफत देण्यात येणार असल्याचे फाउंडेशनचे कृत्रिम अवयव विभागाचे डॉ. सुमित लव्हाळे यांनी सांगितले. या शिबिर बाबत उपस्थित दिव्यांगांनी फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणाऱ्या सेवा सुविधांबाबत समाधान व्यक्त केले आहे.