
हा लढा दिव्यांगांच्या आर्थिक हक्कांसाठी आणि स्वावलंबनासाठीचा निर्णायक टप्पा ठरणार असून राज्यातील सर्व दिव्यांग बांधवांनी मोठ्या संख्येने या लढ्यात सहभागी व्हावे आणि आपला हक्क मिळवण्यासाठी पुढे येण्याचे देखील आवाहन अध्यक्ष बच्चूभाऊ यांनी केले आहे. या लढ्यात सहभागी होण्यासाठी नोंदणी सुरु झाली असून राज्यातील अधिकाधिक दिव्यांग बांधवानी पुढील लिंकवर क्लिक करून नोंदणी करण्याचे प्रहार जनशक्ती पक्षाचे अभियान प्रमुख महेश बडे यांनी केले आहे.
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeKbiAYgJNWaBMDkzn45fqArtVIiqTFyWwxPv1-X4bysev-Ew/viewform?usp=header
दिव्यांग बांधवांनो आपल्या न्याय हक्कांसाठी आवाज उठवा व या लढ्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हा असे आवाहन ही करण्यात आले आहे. ज्या कोणाला रायगड येथील आंदोलनामध्ये सहभागी होण्याची इच्छा आहे, त्यांनी कृपया खालील गुगल फॉर्म भरा.या आंदोलनात जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांनी सहभागी व्हावे,असे आवाहन करण्यात आले आहे. कारण आपले आधारस्तंभ संस्थापक अध्यक्ष बच्चू भाऊ स्वतः तीन दिवस उपोषण करणार आहेत तेही फक्त आपल्यासाठी आणि शेतकऱ्यांसाठी. आपण गुगल फॉर्म भरून या आंदोलनामध्ये सहभागी होऊन बच्चू भाऊंना साथ द्यायची आहे. भाऊ आपल्यासाठी लढत आहेत, तर आपणही त्यांना खंबीर पाठिंबा देऊन आपले आंदोलन यशस्वी करूया त्या करता त्वरित गुगल फॉर्म भरा आणि आंदोलनात सहभागी व्हा असे आवाहन करण्यात येत आहे.
गुगल फॉर्म लिंक: [ https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeKbiAYgJNWaBMDkzn45fqArtVIiqTFyWwxPv1-X4bysev-Ew/viewform?usp=sf_link]