कवठे येमाई गावठाण प्राथमिक शाळेस मैदान उपलब्ध करून द्या :  शाळा व्यवस्थापन समितीची लेखी पत्राद्वारे ग्रामपंचायतीकडे मागणी 

176
समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – शिरूरच्या पश्चिमेकडील कवठे येमाई गावठाणात असलेल्या  जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेस मुलांना खेळण्यासाठी तात्काळ व कायमस्वरूपी मैदान उपलब्ध करून द्या अशी मागणी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भरत भोर व सचिव रंजना गावडे यांनी लेखी पत्राद्वारे ग्रामपंचायतीकडे केली आहे.
     या बाबत अधिक माहिती देताना शा.व्य.समितीचे अध्यक्ष भरत भोर म्हणाले कि, गावठाणातील जिल्हा परिषदेची प्राथमिक केंद्र शाळा ही मोठी शाळा असून पहिली ते सातवी पर्यंत सुमारे २७० विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत आहेत. शाळेतील मुलांना  विविध क्रिडा स्पर्धामध्ये सहभाग घेण्यासाठी शाळेतील ग्राउंड उपलब्ध नसल्या कारणाने विविध प्रकारच्या खेळांचे सराव घेता येत नाही. त्या अनुशंघाने विद्यार्थ्यांमधील विविध क्रीडा कलागुणांना वाव मिळत नसल्यामुळे आपली शाळा विविध स्थरावरती होणाऱ्या स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकत नाही. ग्रामपंचायतने शाळेलगत असलेली ग्रामपंचायत मालकीची सकस आहार योजनेतील जागा कायमस्वरूपी उपलब्ध करुण शाळेस सहकार्य करण्याचे आवाहन भोर यांनी केले आहे.
मनीषा पांडुरंग भोर – सरपंच, ग्रामपंचायत कवठे येमाई 
” कवठे येमाई गावठाणातील प्राथमिक शाळेतील मुलांना खेळण्यासाठी मैदान उपलब्ध करून देण्याबाबतचा शाळा व्यवस्थापन समितीचा अर्ज ग्रामपंचायतीकडे प्राप्त झाला असून शाळेलगतच असलेली ग्रामपंचायत मालकीची सकस आहार योजनेची जागा मुलांना खेळण्यासाठी लवकरच उपलब्ध करून देण्याकामी ग्रामपंचायत स्तरावर निर्णय घेतला जाईल व मुलांना खेळण्यासाठी आवश्यक असलेल्या मैदानाची गैरसोय दूर केली जाईल. ही जागा कायस्वरूपी शाळेस क्रीडांगणा साठी मिळावी म्हणून तसा ग्रामपंचायत बैठकीत ठराव घेऊन संबंधित विभागाकडे लवकरच पाठविण्यात येईल.”   




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *