समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथील महावितरण शाखेकडून वीज ग्राहकांसाठी महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दिनांक 21 मार्च 2026 रोजी टाकळी हाजी येथील विठ्ठल मंदिरात झालेल्या सभेत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असल्याची माहिती शाखा अभियंता नितीन मुरकुटे यांनी सा.समाजशील शी बोलताना दिली.
3 HP व 5 HP क्षमतेच्या शेतीपंपाचे चालू वीज बिल माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र 7.5 HP व त्यापेक्षा जास्त क्षमतेच्या शेतीपंपधारकांनी आपले वीज बिल नियमितपणे भरावे,असे स्पष्ट करण्यात आले आहे.दरम्यान, सध्या सुरू असलेल्या लोडशेडिंगच्या काळात सायंकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत कोणत्याही परिस्थितीत शेतीपंपाची मोटार सुरू करू नये,असे आवाहन करण्यात आले आहे.जर ग्राहकांनी स्वतःहून त्याकाळात शेतीपंप बंद ठेवले तर यामुळे फीडरवरील वीज भार संतुलित राहून घरगुती ग्राहकांना पुरेशा दाबाने वीजपुरवठा करता येणार आहे.तसेच थकबाकीदार ग्राहकांनी आपले घरगुती,औद्योगिक व वाणिज्य वीज बिल तातडीने भरून महावितरणला सहकार्य करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.महावितरणच्या या निर्णयामुळे वीज व्यवस्थापन सुधारण्यास मदत होणार असून, ग्राहकांनी नियमांचे पालन करावे,असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
Home पुणे टाकळी हाजी परिसरातील वीज ग्राहकांना महत्त्वाचे आवाहन; सायंकाळी ६ ते १० या वेळात शेतीपंप वापरावर स्वतःहून निर्बंध घाला : महावितरण

टाकळी हाजी परिसरातील वीज ग्राहकांना महत्त्वाचे आवाहन; सायंकाळी ६ ते १० या वेळात शेतीपंप वापरावर स्वतःहून निर्बंध घाला : महावितरण
BySamajsheel NewsMarch 24, 20260
Previous Postरयतच्या कवठे हायस्कूल ची नवसंजीवनी : आगीतून उभा राहिलेला आधुनिक प्रयोगशाळा व इमारतीचा नवा प्रवास
Next Postपुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पी आय पदी प्रमोद क्षीरसागर यांची नियुक्ती ; गुन्हेगारीविरोधात कडक कारवाईचे संकेत
