समाजशील न्यूज नेटवर्क.शिरूर,पुणे : (देवकीनंदन शेटे,संपादक) : सातत्याने स्पर्धात्मक परीक्षा क्रीडा प्रकारात उज्वल यश संपादित करीत असलेल्या शिरूर तालुक्यातील कवठे येमाई गावठाण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील दुसरी इयत्तेतील तब्बल १० विद्यार्थ्यांनी मंथन राज्यस्तरीय सामान्यज्ञान परीक्षेत १०० पेक्षा अधिक गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले. या यशामुळे शाळेचे नाव जिल्हास्तरावर उज्ज्वल झाले आहे.शाळेच्या या उत्तुंग यशाबद्दल जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र गावडे, शिरूर पंचायत समिती सदस्या कांचन सांडभोर,जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भारत भोर,सरपंच मनीषा भोर,शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य,शिक्षणप्रेमी ग्रामस्थांनी मंथन परीक्षेत यश मिळविणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे,शाळेच्या मुख्याध्यापिका रंजना गावडे,वरिष्ठ शिक्षक सखाराम फंड व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल पालक श्रीमती अनुराधा सोमनाथ काटकर यांनी या विद्यार्थ्यांना नुकतेच शाळेत येऊन वह्या व पेन देऊन त्यांचा सन्मान करत कौतुक केले. त्यांच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये अधिक उत्साह निर्माण झाला.पालकांनीही मनापासून शाळेचे अभिनंदन व आभार व्यक्त करीत शाळेच्या अधिकाधिक गुणवत्तावान प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
Home पुणे मंथन राज्यस्तरीय सामान्यज्ञान परीक्षेत कवठे येमाई शाळेचे उज्ज्वल यश : शाळा व्यवस्थापन समिती,ग्रामस्थांकडून अभिनंदन

मंथन राज्यस्तरीय सामान्यज्ञान परीक्षेत कवठे येमाई शाळेचे उज्ज्वल यश : शाळा व्यवस्थापन समिती,ग्रामस्थांकडून अभिनंदन
BySamajsheel NewsApril 7, 20260
Previous Postमेजर यशवंत बारगजे यांचा सेवापूर्ती समारंभ उत्साहात संपन्न ; बारगजवाडीत जल्लोषात गौरव
Next Postयुवा क्रांती संघटनेच्या युवती अध्यक्षा जयश्रीताई अहिरे यांचा गौरव ; उत्कृष्ट समाजकार्याबद्दल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान
