समाजशील न्यूज नेटवर्क,नाशिक : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – युवा क्रांती फाउंडेशन पोलीस मित्र संघटनेच्या झुंजार रणरागिणी,राष्ट्रीय युवती अध्यक्षा जयश्रीताई अहिरे यांना त्यांच्या उल्लेखनीय समाजकार्याबद्दल नुकतेच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.


युवा क्रांती संघटनेच्या माध्यमातून राज्यभरात विविध सामाजिक व लोकउपयोगी उपक्रम राबवत असलेल्या जयश्रीताई अहिरे यांच्या कार्याचा यावेळी विशेष गौरव करण्यात आला. त्यांच्या कार्यामुळे समाजात सकारात्मक बदल घडत असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी यावेळी व्यक्त केले.
जयश्रीताईंना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल युवा क्रांती फाउंडेशन पोलीस मित्र संघटनेचे संस्थापक,अध्यक्ष रवींद्र सूर्यवंशी, डॉ. राजेश्वर हेंद्रे,नानासाहेब बढे, शिवाजीराव शेलार, राष्ट्रीय मीडिया प्रमुख मार्गदर्शक वरिष्ठ पत्रकार प्रा. सुभाष शेटे,राकेश वाघ,अनिल रेळेकर,राजेंद्र पन्हाळे,अमर सोकांडे,अमित तांबे,अमृताई पठारे, श्रीमती वर्षाताई नाईक,वसुधाताई नाईक,किरणताई बेंडाळे, वैशालीताई बांगर,मीनाताई गवारे,संगीताताई रोकडे,जयश्रीताई इंगळे,स्मिता बांदेकर,प्रतिभा महालकर,हर्षला मुलाणी, प्रदेश अध्यक्ष महादू महाराज अहिरे, तसेच संघटनेतील सर्वच महिला पदाधिकारी व सदस्य यांनी जयश्रीताई अहिरे यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या कार्यातून समाजातील युवक-युवतींना प्रेरणा मिळत असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.

