NEWS
Search

पालिकेने प्रशांत वाघमारे प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाद मागावी –  हायलाईट फोरमचे अध्यक्ष उमेश नाईक यांची मागणी

108

समाजशील न्यूज नेटवर्क,पुणे : (प्रा.सुभाष अण्णा शेटे,कार्यकारी संपादक – पुणे महानगरपालिकेचे माजी शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्याविरोधातील बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात महानगरपालिकेने सर्वोच्च न्यायालयात दाद मागावी, अशी मागणी हायलाईट फोरमचे अध्यक्ष उमेश नाईक यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांना दिलेल्या पत्रात नाईक यांनी नमूद केले आहे की, वाघमारे यांच्यावरील आरोप गंभीर स्वरूपाचे असून त्यांची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही महानगरपालिकेने कायदेशीर पावले उचलून सर्वोच्च न्यायालयात अपील करावे, जेणेकरून प्रकरणाचा योग्य निकाल लागू शकेल.तसेच, वाघमारे यांच्यावरील आरोप निराधार असल्याचे सिद्ध करण्यासाठीही पारदर्शक चौकशी आवश्यक असल्याचे पत्रात म्हटले आहे. या संदर्भात महानगरपालिकेने तातडीने कारवाई करून न्यायालयीन प्रक्रियेत पुढाकार घ्यावा, अशी मागणी उमेश नाईक यांच्याकडून करण्यात आली आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *