समाजशील न्यूज नेटवर्क,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) : कात्रज डेपो व स्वारगेट विभागात बस पास मिळविताना विद्यार्थ्यांना आणि ज्येष्ठ नागरिकांना होत असलेल्या गैरसोयीबाबत पोलीस तपास सीनियर क्राईम रिपोर्टर चेतन शर्मा,महाराष्ट्र प्रदेश महिला सिनिअर क्राईम रिपोर्टर वर्षाताई नाईक,महाराष्ट्र प्रदेश सिनिअर क्राईम रिपोर्टर प्रा.सुभाष अण्णा शेटे यांनी पीएमपीएमएल स्वारगेट पुणे येथील कार्यालयात दिलेल्या लेखी निवेदनाची गंभीर दखल घेण्यात आली आहे. सकाळी एका विद्यार्थ्याने फोन करून बस पास मिळविताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याची माहिती चेतन शर्मा यांना दिली. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना दोन-दोन तास रांगेत उभे राहावे लागत असल्याने अनॆक जेष्ठ नागरिकांनी प्रशासनाच्या या भोंगळ कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
या पार्श्वभूमीवर PMPML च्या स्वारगेट विभागात प्रत्यक्ष भेट देत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. महा एनजीओ फेडरेशन नागरिक समस्या निवारण केंद्राचे कक्ष प्रमुख व पोलीस तपास सीनियर क्राईम रिपोर्टर चेतन शर्मा यांनी विभागीय बस पास अधिकारी विकास मते यांची भेट घेऊन परिस्थितीची सविस्तर माहिती दिली.
या वेळी विद्यार्थ्यांना व ज्येष्ठ नागरिकांना बस पास मिळविताना होणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात,अशी मागणी निवेदन देत करण्यात आली. संबंधित अधिकाऱ्यांनीही प्रकरणाची तात्काळ व योग्य चौकशी करून लवकरच योग्य तो मार्ग काढण्यात येईल तसेच विद्यार्थ्यांना व ज्येष्ठ नागरिकांना मदत करण्यासाठी सहकार्य केले जाईल, असे आश्वासन दिले.या चर्चे दरम्यान चेतन शर्मा स्वतः उपस्थित होते. नागरिकांच्या सोयीसाठी लवकरात लवकर सकारात्मक निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.