समाजशील न्यूज नेटवर्क,पुणे (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – अक्षय तृतीया म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त व हिंदू संस्कृतीतील एक आनंदाचा सण येत्या रविवार दिनांक 19 एप्रिल 2026 रोजी साजरा होत आहे. अक्षय तृतीया या पवित्र सणानिमित्त एक सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे. या दिवशी पारंपरिक पद्धतीने घराघरांत आंब्याची पूजा करून आमरसाचा नैवेद्य दाखवला जातो. याच परंपरेतून प्रेरणा घेत गरजू, अनाथ, व्याधीग्रस्त मुले तसेच वृद्धाश्रमातील आजी-आजोबांसाठी आमरस वाटप करण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला असल्याची माहिती जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते विठ्ठलराव माने,चेतन शर्मा यांनी सा.समाजशील शी बोलताना दिली.

समाजातील अनाथ,व्याधीग्रस्त मुले,वृद्धाश्रमातील आजी-आजोबा यांना ही या सणाचा आनंद घेता यावा या हेतूने हा उपक्रम पारदर्शकपणे राबविण्यात येत असून या उपक्रमामुळे सणाचा आनंद गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्नकरण्यात येत असून, समाजात सहकार्य आणि माणुसकीची भावना अधिक दृढ होण्यास मदत होणार आहे.आपले सहकारी, बंधू-भगिनी आणि मित्रपरिवार यांनी या उपक्रमात स्वेच्छेने सहभागी होऊन “फुल नाही तर फुलाची पाकळी” या भावनेतून मदतीचा हात पुढे करावा,असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या उपक्रमासाठी आर्थिक किंवा वस्तुरूपाने मदत करू इच्छिणाऱ्या इच्छुकांनी खालील संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा –
श्री. चेतन शर्मा – 9975968870
श्री. विठ्ठल माने – 9922304897
श्री. चेतन शर्मा – 9975968870
श्री. विठ्ठल माने – 9922304897

