दिपक कारंडे यांची पोलीस निरीक्षक पदावर झेप; शिरूरकरांचा अभिमान वाढला

43

समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक)  – कर्तव्यदक्षता, शिस्तबद्ध कामकाज आणि प्रभावी जनसंपर्क यामुळे ओळखले जाणारे शिरूर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक कारंडे यांना राज्य शासनाकडून पोलीस निरीक्षक पदावर पदोन्नती मिळाली आहे. ९ एप्रिल २०२६ रोजी महाराष्ट्र पोलीस महासंचालक कार्यालयाने याबाबतचा आदेश जारी केला असून त्यांची नियुक्ती पुणे शहरात करण्यात आली आहे.
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ अंतर्गत पोलीस आस्थापना मंडळ क्रमांक २ मार्फत राज्यभरातील २०१ सहाय्यक पोलीस निरीक्षकांना ही पदोन्नती देण्यात आली आहे. त्यामध्ये दिपक करांडे यांचा समावेश असून त्यांच्या या यशामुळे शिरूर परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शिरूर पोलीस ठाण्यात कार्यरत असताना करांडे यांनी विशेषतः टाकळी हाजी पोलीस दुरक्षेत्रात गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवत अनेक गुन्ह्यांचा छडा लावला. त्यांच्या कामातील काटेकोरपणा, नागरिकांशी असलेला संवाद आणि तत्परतेमुळे ते सर्वसामान्यांमध्ये लोकप्रिय ठरले.
त्यांच्या या पदोन्नतीबद्दल शिरूर तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून विविध सामाजिक, राजकीय आणि नागरिकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. कारंडे यांच्या पुढील वाटचालीसाठी सर्वत्र शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *