समाजशील न्यूज नेटवर्क,हडपसर,पुणे : (प्रा.सुभाष अण्णा शेटे,कार्यकारी संपादक) – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त हडपसर डेपो येथे अत्यंत उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमास युवा क्रांती पोलीस मित्र व माहिती अधिकार,पत्रकार संरक्षण संघटनेचे पदाधिकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.युवा क्रांती पोलीस मित्र संघटनेच्या वतीने पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष राजेंद्र पन्हाळे,राजू चौधरी, पुणे जिल्हा युवा संपर्क प्रमुख बबन दरगुडे, पश्चिम महाराष्ट्र युवा सचिव अमित तांबे, फुरसुंगी युवा सदस्य महेश कडदेकर आणि पुणे जिल्हा युवा अध्यक्ष किशोर गायकवाड यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून हडपसर डेपो मॅनेजर मोहन पिसाळ, वर्कशॉप विभागाचे डी.एम.राहुल जाधव, शिवसेना कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष उमेश पांढरे, शिवसेना सचिव नरेंद्र आवारे, उपाध्यक्ष हरीश माने, कार्यसंघटक राजेंद्र निकम, हडपसर डेपो अध्यक्ष प्रदीप आखाडे, तसेच मार्गदर्शक योगेश इनामके उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान नरेंद्र आवारे,शिवसेना सचिव यांच्या हस्ते युवा क्रांती पोलीस मित्र संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष राजेंद्र पन्हाळे यांचा उत्कृष्ट सामाजिक कार्याबद्दल शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात राजेंद्र पन्हाळे यांच्या कार्याचे कौतुक केले.तसेच अध्यक्ष कांबळे साहेब,हडपसर अंगार हेडकॉटर विभागाचे आप्पा थोरात, वर्कशॉप सुपरवायझर कानपिळे आणि चालक दयानंद गायकवाड यांनीही कार्यक्रमाला विशेष उपस्थिती लावली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याचा गौरव करत समाजात समानता, बंधुता आणि शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले.कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले असून, उपस्थित सर्वांनी बाबासाहेबांच्या विचारांवर चालण्याचा निर्धार व्यक्त केला. उपस्थितांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

