भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती हडपसर डेपो येथे उत्साहात साजरी : विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती

12

समाजशील न्यूज नेटवर्क,हडपसर,पुणे : (प्रा.सुभाष अण्णा शेटे,कार्यकारी संपादक) – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त हडपसर डेपो येथे उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात भव्य कार्यक्रम पार पडला.सर्व कामगार व पदाधिकारी यांनी मिळून आंबेडकर जयंती साजरी केली युवा क्रांती पोलीस मित्र व माहिती अधिकार पत्रकार संघटनेच्या वतीने आयोजित या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.संघटनेच्या वतीने पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष श्री राजेंद्र पन्हाळे, श्री राजू चौधरी, पुणे जिल्हा युवा संपर्कप्रमुख श्री बबन दरगुडे, पश्चिम महाराष्ट्र युवा सचिव श्री अमित तांबे, फुरसुंगी युवा सदस्य श्री महेश कडदेकर आणि पुणे जिल्हा युवा अध्यक्ष श्री किशोर गायकवाड यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माननीय नगरसेवक श्री नितीन दादा गावडे तसेच हडपसर महिला कमिटी अध्यक्षा सौ. उज्वला सायकर ताई यांची विशेष उपस्थिती लाभली.
तसेच हडपसर डेपो मॅनेजर श्री मोहन पिसाळ, वर्कशॉप विभागाचे डी.एम. श्री राहुल जाधव, शिवसेना कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष श्री उमेश पांढरे, शिवसेना सचिव श्री नरेंद्र आवारे, उपाध्यक्ष श्री हरीश माने, कार्य संघटक श्री राजेंद्र निकम, हडपसर डेपो अध्यक्ष श्री प्रदीप आखाडे आणि मार्गदर्शक श्री योगेश इनामके यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी शिवसेना सचिव श्री नरेंद्र आवारे यांच्या हस्ते पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष श्री राजेंद्र पन्हाळे यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या सत्कार प्रसंगी उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांच्या कार्याचा गौरव केला.


तसेच अध्यक्ष श्री कांबळे साहेब, हडपसर अंगार हेडकॉटर विभागाचे श्री आप्पा थोरात, वर्कशॉप सुपरवायझर श्री कानपिळे साहेब आणि चालक श्री दयानंद गायकवाड यांनीही कार्यक्रमाला विशेष उपस्थिती लावली.कार्यक्रमादरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मान्यवरांनी त्यांच्या विचारांचा गौरव करत समाजात समानता, बंधुता आणि शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले.कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले असून उपस्थित सर्वांनी बाबासाहेबांच्या विचारांवर चालण्याचा निर्धार व्यक्त केला. कार्यक्रमाचा शेवट आभार प्रदर्शनाने झाला.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *