समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (देवकीनंदन शेटे,मुख्य संपादक) – पुणे जिल्ह्यातील शिरूर पोलिस स्टेशनच्या डी.बी. पथकाने उत्कृष्ट तपासकौशल्य दाखवत तब्बल २४ लाख रुपये किंमतीचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत करून एका आरोपीस अटक केली आहे. या कारवाईमुळे परिसरातील घरफोडीच्या गुन्ह्याचा यशस्वी उलगडा झाला आहे.
शिरूर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिरूर तालुक्यातील आनंद सोसायटी परिसरातील एका घरातून फेब्रुवारी २०२६ दरम्यान सोन्या-चांदीचे दागिने, चांदीची भांडी व इतर मौल्यवान वस्तू चोरीस गेल्या होत्या. याप्रकरणी फिर्यादी यांनी शिरूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांनी तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला. तपासादरम्यान आरोपी विलास आनंदा खोसडे (रा. भायेगाव, ता. मुखेड, जि. नांदेड) याचा ठावठिकाणा मिळाल्यानंतर पोलिस पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याच्याकडून सुमारे ७ किलो १३४ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने व वस्तू तसेच ३६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा एकूण २४ लाख रुपये किंमतीचा चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल,अपर पोलिस अधीक्षक डॉ. शुभमकुमार सो, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले आणि पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत पोलिस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांच्यासह डी.बी. पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या यशस्वी कारवाईबद्दल शिरूर पोलिसांच्या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

शिरूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई : २४ लाखांचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत, आरोपी जेरबंद
BySamajsheel NewsMay 30, 20260
Previous Postधनकवडीतील त्या धोकादायक चेंबरची अखेर दुरुस्ती; जेष्ठ समाजसेविका व युवा क्रांती संघटनेच्या वर्षाताई नाईक यांच्या पाठपुराव्यास यश
Next Postकुकडी प्रकल्प डावा कालवा वितरिका स्तरीय पाणीवापर संस्था महासंघाची नवीन कार्यकारणी जाहीर ; वरिष्ठ पत्रकार प्रा.सुभाष शेटे यांची तज्ञ संचालक पदी नियुक्ती
