समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – गुरव सोशल फाउंडेशन महाराष्ट्र राज्याच्या पुणे जिल्हा संपर्कप्रमुखपदी प्रशांत भाऊ सांगडे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.सामाजिक कार्याची आवड आणि समाजहितासाठी सातत्याने कार्य करण्याची भूमिका लक्षात घेऊन त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यात गुरव सोशल फाउंडेशनचे सामाजिक कार्य अधिक प्रभावीपणे पुढे जाईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
प्रशांत भाऊ सांगडे यांना समस्त ग्रामस्थ कवठे येमाई यांनी पुढील सामाजिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत तसेच त्यांना उदंड आयुष्य, उत्तम आरोग्य, सुख-समृद्धी आणि यश लाभो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करण्यात आली असून त्यांचे नेतृत्व, मार्गदर्शन आणि समाजहिताची धडपड अशीच कायम राहो, या सदिच्छाही व्यक्त करण्यात आल्या आहेत.

प्रशांत भाऊ सांगडे यांची गुरव सोशल फाउंडेशनच्या पुणे जिल्हा संपर्कप्रमुखपदी निवड
BySamajsheel NewsAugust 28, 20260
Previous Postकांद्याला मिळतोय ५० रुपये किलोपर्यंत दर; शेतकऱ्यांना मोठा दिलासा
Next Postप्रशासन सुस्त की नागरिकांचा बेफिकीरपणा? वर्षाताई नाईक यांचा संतप्त सवाल धनकवडीतील स्वच्छतेचा बोजवारा; केके मार्केट परिसरासह पुण्याई नगर लेन क्रमांक ४ मध्ये कचऱ्याचे साम्राज्य
