NEWS
Search

शाळा व्यवस्थापन समितीचा ‘अ‍ॅक्शन मोड’; जंक फूड बंद, सभोवतालचे अतिक्रमण हटविण्याचा थेट इशारा : अन्यथा कारवाई अटळ

162
समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) : विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षितता लक्षात घेऊन शाळेच्या ५० मीटर परिसरातील जंक फूडची विक्री तात्काळ बंद करण्यात यावी, तसेच शाळेच्या संरक्षण भिंतीलगत असलेले अतिक्रमण त्वरित हटवावे, असा ठराव आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झालेल्या शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकीत करण्यात आला.यामुळे आता  शाळा व्यवस्थापन समितीचा ‘अ‍ॅक्शन मोड सुरु झाला असून संरक्षण शाळे भिंती सभोवतालच्या ५० मीटर परिसरातील दुकानांतून सुरु असलेली जंक फूड विक्री तात्काळ बंद करा, सभोवतालचे अतिक्रमण स्वतःहून हटवा अन्यथा कारवाई अटळ असल्याचा इशारा ही आजच्या बैठकीत देण्यात आला आहे. सभेच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भरतशेठ भोर हे होते.
      प्रारंभी मुख्याध्यापक शांताराम पोकळे यांनी आजच्या बैठकीत शालेय कामकाज, ५० मीटर परिसरात असलेली जंक फूडला बंदी, शाळा भिंती लगतचे अतिक्रमण शाळेच्या परिसरात अस्वच्छता निर्माण करणारे तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम करणारे खाद्यपदार्थ विक्रीचे प्रकार थांबविण्याची गरज पोकळे यांनी बैठकीत बोलताना व्यक्त केली. तसेच संरक्षण भिंतीलगत करण्यात आलेले अतिक्रमण विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकते. त्यामुळे संबंधितांनी अतिक्रमण तात्काळ हटवावे, अन्यथा नियमानुसार कारवाई करण्यात यावी, असा निर्णय समितीने आजच्या बैठकीत घेतला.
यावेळी मुख्याध्यापक शांताराम पोकळे, शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा डॉ. आरती उचाळे,अर्चना देवकर,तज्ञ शिक्षण संचालक वरिष्ठ पत्रकार सुभाष अण्णा शेटे,प्रशांत सांगडे,भाऊसाहेब घोडे,गणेश गावडे,विलास सालकर यांच्यासह समितीचे सदस्य व अनेक मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि शाळेची सुरक्षितता याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, शाळेच्या संरक्षण भिंतीला अतिक्रमणाचा विळखा झाला असून जंक फूड विक्रेत्यांनाही  लेखी समज देण्यात यावी,विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ नको असा स्पष्ट संदेश या ठरावातून देण्यात आला आहे.
– प्रा.सुभाष शेटे,९९७५६७४२८६



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *