समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) : रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, थोर शिक्षणमहर्षी व पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३९ व्या जयंती सोहळ्याचे आयोजन न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स, कवठे येमाई येथे करण्यात आले आहे.
“शिक्षणातून समाज परिवर्तनाचा विचार रुजविणाऱ्या कर्मवीर यांना अभिवादन करण्यासाठी कवठे येमाई सज्ज! झाली असून सोमवार, दि. २८ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजता विद्यालयाच्या परिसरात हा जयंती सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडणार आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. प्रा. डॉ. डी. जी. हिंगणे (मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, रयत शिक्षण संस्था, सातारा) राहणार असून, मा. श्री. प्राचार्य किसनराव डी रत्नपारखी (जनरल बॉडी सदस्य, रयत शिक्षण संस्था, सातारा) यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच मा. डॉ. ज्ञानेश्वर थोरात (रयत सेवक, मंचर) हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत.

विद्यालयाचे प्राचार्य मा. श्री. एस. डी. मुंजावडे यांच्या वतीने या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले असून, स्थानिक स्कूल कमिटी, शाळा व्यवस्थापन समिती, पालक शिक्षक संघ, माजी विद्यार्थी संघ, भौतिक विकास समिती, आजी-माजी सरपंच, उपसरपंच व सदस्य, समस्त ग्रामस्थ, विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि सेवकवृंद यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
– प्रा.सुभाष शेटे,९९७५६७४२८६

