समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) : कवठे येथील ढाकी वस्ती परिसरात रात्रीच्या सुमारास एका पाळीव कुत्र्याचा विहिरीत पडून अपघात झाला. बहुदा बिबट्याने पाठलाग केल्याने जीव वाचवायच्या प्रयत्नात हा पाळीव कुत्रा विहिरीत पडला असण्याची शक्यता उपस्थितांनी व्यक्त केली आहे. विहिरीत पाणी होते व बाजूलाच खडकाची कपार असल्याने कुत्रा रात्रभर त्याव उभाच होता. दत्तात्रय सांडभोर हे सकाळी मोटार सुरू करण्यासाठी विहिरीजवळ गेल्यानंतर कुत्रा विहिरीत पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
कुत्र्याला बाहेर काढण्यासाठी दत्तात्रय सांडभोर, नितीन बाळासाहेब मुखेकर, पोपट सांडभोर आणि मनीषाताई सांडभोर यांनी तत्काळ धाव घेत मोलाचे सहकार्य केले. मोठ्या प्रयत्नांनंतर कुत्र्याच्या पोटाला रस्सी बांधून त्याला काळजीपूर्वक विहिरीबाहेर काढण्यात आले. सुदैवाने या घटनेत कुत्र्याला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही.
दरम्यान, नितीन शरद मुखेकर हे देखील आपल्या दोन-तीन सहकाऱ्यांसह मदतीसाठी घटनास्थळी येत होते. मात्र, ते पोहोचेपर्यंत कुत्र्याला सुखरूप बाहेर काढण्यात आले होते. त्यांच्या तसेच त्यांच्या सहकाऱ्यांच्या तत्परतेबद्दलही ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले.मानवते सोबतच मुक्या जीवांप्रतीही संवेदनशीलता जपणाऱ्या या ग्रामस्थांच्या तत्परतेचे परिसरातून कौतुक होत आहे.