समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (देवकीनंदन शेटे,संपादक) – कवठे आणि पंचक्रोशितील एक प्रसिद्ध जागृत देवस्थान असलेल्या श्री दत्त मंदिरात आयोजित अखंड हरिनाम सप्ताह नुकताच मोठ्या उत्साहात व दिमाखात संपन्न झाला. या वर्षी सप्तांहाचे सुवर्णमहोत्सवी ५० वे वर्ष असल्याने सांगता समारोहाच्या दिवशी गावात सकाळी दिनी काढण्यात आली होती. तर त्या निमित्त कवठे गावठाणात रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यात मनिषा संतोष चिद्दरवार यांनी हाताने काढलेल्या श्री दत्त गुरूंच्याकाढलेल्या आकर्षक रांगोळीस प्रथम क्रमांक मिळाला. तर मनिषा नवनाथ रायकर,द्वितीय,साक्षी बबन रोडे,तृतीय असे उत्कृष्ट रांगोळीचे तीन क्रमांक विजयी ठरले.
![](https://samajsheel.com/wp-content/uploads/2024/12/m-1-300x229.jpg)
![](https://samajsheel.com/wp-content/uploads/2024/12/m-22-247x300.jpg)
तर उत्तेजनार्थ दीक्षा प्रतीक चोरे, नंदा अशोक माटे,सोनाली अतुल कुलथे,रंजना आहेर,निता हर्षल काळे, भाग्यश्री गोकुळ छल्लाणी,सोनाली ज्ञानेश्वर कांदळकर, मधुरा शेखर रेनके,राणी प्रशांत सांगडे, अलका विजय कुंभार,प्रियांका चेतन बांगर, प्रियांका अक्षय भंडारी,अनीता हेमंत जाधव,मृणाल सुभाष पोखरकर, दर्शना निलेश राजगुरू, मेघना संदीप सांडभोर,वृषाली प्रतीक चौधरी यांना बक्षिसे देण्यात आली.