नागरिकांना अनुदान, वीजबचत आणि अर्ज प्रक्रियेची माहिती; पंचायत समितीचा विशेष उपक्रम
समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – वाढत्या वीजखर्चाला पर्याय देतानाच पर्यावरणपूरक आणि स्वच्छ ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी प्रधानमंत्री सूर्यघर वीज योजना तसेच स्वयंंपूर्ण महाराष्ट्र रूफटॉप (स्मार्ट) सोलर योजना याबाबत शिरूर पंचायत समितीच्या वतीने नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.या उपक्रमांतर्गत पंचायत समिती परिसरात माहिती किऑस्क उभारून नागरिकांना रूफटॉप सोलर चे फायदे, उपलब्ध शासकीय अनुदान, पात्रता, अर्ज करण्याची पद्धत आणि घराच्या छतावर सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी आवश्यक प्रक्रिया याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.१५ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत स्वयंंपूर्ण महाराष्ट्र रूफटॉप (स्मार्ट) सोलर योजनेच्या जनजागृती साठी विशेष अभियान राबविण्यात येत आहे. या काळात अधिकाधिक नागरिकांनी सौरऊर्जेचा वापर करावा, यासाठी माहिती पोहोचविण्यावर भर देण्यात येत आहे.
वीज बिलात बचत अन् पर्यावरणाचे संरक्षण
घराच्या छतावर सौरऊर्जा प्रकल्प उभारल्यास पारंपरिक विजेवरील अवलंबित्व कमी होऊन वीजबिलात संभाव्य बचत, स्वच्छ ऊर्जेचा वापर आणि पर्यावरण संवर्धनाला हातभार लागू शकतो. त्यामुळे शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन नागरिकांनी आपल्या घरांवर रूफटॉप सोलर बसविण्याचा विचार करावा, असे आवाहन करण्यात आले.यावेळी शिरूर पंचायत समितीच्या सभापती स्वाती घावटे, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, गटविकास अधिकारी महेश ढोके, महावितरण बारामती मंडळाचे अधीक्षक अभियंता दीपक लहामगे, शिरूर उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता शरद माने, शिक्रापूर उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता सुमित जाधव, नोडल अधिकारी गणेश गोरे, संदेश पगारिया, थोरात मॅडम तसेच महावितरणचे अधिकारी-कर्मचारी आणि वीज ग्राहक उपस्थित होते.
महावितरणच्या माध्यमातून नागरिकांना सौरऊर्जेचा वापर केल्यास होणारी संभाव्य बचत, पर्यावरणपूरक ऊर्जेचे महत्त्व, रूफटॉप सोलरची कार्यपद्धती, उपलब्ध शासकीय अनुदान आणि योजनेसाठी अर्ज करण्याच्या प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यात आले.“घराघरात सौरऊर्जा पोहोचली तर वीजबचतीसोबतच स्वच्छ आणि शाश्वत ऊर्जेच्या दिशेने महाराष्ट्राची वाटचाल अधिक वेगवान होईल,” असा संदेश या जनजागृती अभियानातून देण्यात आला.
Home बातम्या पुणे घराघरात सौरऊर्जेचा प्रकाश; ‘सूर्यघर’ आणि ‘स्मार्ट सोलर’ योजनेची शिरूरमध्ये जनजागृती

घराघरात सौरऊर्जेचा प्रकाश; ‘सूर्यघर’ आणि ‘स्मार्ट सोलर’ योजनेची शिरूरमध्ये जनजागृती
BySamajsheel NewsOctober 6, 20260
Previous Postज्येष्ठांच्या निरोगी आयुष्यासाठी धामारी त आरोग्याचा जागर; तपासणीसोबत दिला ‘दहा सूत्री मंत्र’
Next Postपोलीस मित्र संघाकडून सामाजिक कार्याचा व्यापक उपक्रम - अध्यक्ष शाम घाडगे यांची माहिती
